muhurat trading,muhurat trading 2023,muhurat trading 2023 marathi,muhurat trading 2023 time,
मुहूर्त ट्रेडिंग 2023 दिवस अणि टाइम
- Date : 12 नोवेम्बर 2023
- Time : संध्याकाळी ६.१५ ते ७.१५
शेअर बाजारात दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरील ट्रेडिंगला विशेष महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आज (ता. १२) संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ या एका तासाच्या कालावधीत मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) मुहूर्ताचे ट्रेडिंग होईल. त्याआधी १५ मिनिटांचे पूर्व-सत्र असेल, त्यानंतर एक तासाचे ट्रेडिंग सत्र होईल.
दिवाळीच्या काळात शेअर बाजाराला या दिवशी सुटी असते. मात्र, या मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी शेअर बाजार उघडले जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, दिवाळीला नव्या संवत्सराची सुरुवात होते आणि हे मुहूर्ताचे सत्र शेअर
बाजारातील आगामी वर्षांचे संकेत देते. त्यामुळे या मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्राला विशेष महत्त्व आहे.
यंदाचे सत्र संवत २०८० ची सुरुवात आणि संवत २०७९ ची समाप्ती असेल. या शुभ मुहूर्तावर केल्या जाणाऱ्या ट्रेडिंगमुळे वर्षभर संपत्ती आणि समृद्धी लाभते, भरभराट होते, असे मानले जाते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार आवर्जून ही परंपरा पाळतात. मुहूर्ताच्या शेअर ट्रेडिंगसाठी इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्हज, करन्सी डेरिव्हेटिव्हज, इक्विटी फ्युचर, ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग यासह विविध विभाग खुले असतील. या तासाभराच्या कालावधीत शेअर बाजारातील उत्साह विलक्षण असतो.
मुहूर्त ट्रेडिंगला तेजीचा कल राहण्याचा अंदाज?
मागील वर्षात २४ ऑक्टोबर रोजी हे मुहूर्ताचे शेअर ट्रेडिंग झाले होते. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘Sansex‘
५२४ अंशांनी वाढला होत.
मुहूर्त ट्रेडिंगला आहे दीडशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा
- मुहूर्त ट्रेडिंगची ही प्रथा दशकअधिक जुनी आहे. मुंबई शेअर बाजाराने (BSE) १९५७ मध्येही परंपरा सुरू केली, तर ‘NSE’ने १९९२ मध्ये ही परंपरा सुरू केली.
- ऑनलाइन ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी, ब्रोकर, गुंतवणूकदार मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीत एकत्र येऊन विधीवत पूजा करून पुढील किमान एका वर्षासाठी ठेवू इच्छित असलेल्या शेअरसाठी ऑर्डर देत असत. आता ऑनलाइन सुविधा सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार घरून या ट्रेडिंगमध्ये सहभागी होतात.
- यानिमित्ताने शेअर बाजारात आकर्षक सजावट, रोषणाई केली जाते. अनेक गुंतवणूकदार प्रातिनिधिक स्वरूपात शेअर खरेदी करून शेअर ट्रेडिंगचा मुहूर्त करतात. काही जण मुहूर्तावर घेतलेले शेअर पुढील पिठ्यांसाठी राखून ठेवतात, तर काही जण या वेळेत नफा नोंदवितात.
मुहूर्त ट्रेडिंगला आपण शेअर्स खरेदी करू शकतो का?
होय, तुम्ही मुहूर्ताच्या ट्रेडिंग दरम्यान शेअर्स खरेदी करू शकता.
झिरोधामध्ये मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?
भारतीय शेअर बाजारात दिवाळी आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर झिरोधामध्ये मुहूर्त ट्रेडिंग होतो. यावेळी ब्रोकर गुंतवणूकदारांना खरेदी-विक्रीसाठी विशेष सेवा पुरवतात. गुंतवणूकदारांना विविध समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
2023 मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता?
Date : 12 नोवेम्बर 2023
Time : संध्याकाळी ६.१५ ते ७.१५इंट्राडे ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम निर्देशक कोणता आहे?
इंट्राडे ट्रेडिंगसाठी चांगल्या निर्देशकांमध्ये तांत्रिक निर्देशक (मूव्हिंग अॅव्हरेज, RSI, बोलिंगर बँड), मूलभूत विश्लेषण, हब कोटेशन आणि बाजारातील बातम्यांचे मूल्यांकन यांचा समावेश होतो. तुमची स्वतःची रणनीती तयार करणे आणि तुमचे ध्येय आणि जोखीम सहनशीलता लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.
3 thoughts on “मुहूर्त ट्रेडिंग 2023”