कोण होणार 2024 मध्ये कोल्हापूर चा खासदार ? Kolhapur MP?

Kolhapur MP election 2024

Kolhapur MP Election 2024 : नमस्कार मित्रानो, असे म्हटले जाते कि संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हे अवघ्या ३ जागांवर अवलंबून आहे. त्या जागा म्हणजे कोल्हापूर, सांगली,आणि सातारा या आहेत. आणि या ३ जागाणं खूप जुना राजकीय वारसा पण आहे आहे.

तर आपण आज या ३ जागांपैकी एक कोल्हापूर मतदार संघाबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत.

सध्या लोकसभेच्या मतदानाचे (Lok Sabha election 2024) वारे चालू आहे. आणि कोल्हापूर मध्ये पण असच एक चुरशीचा सामना बगायला भेटतो त्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या विरुद्धच्या शिवसेनेचे संजय मंडलिक आहेत.

कोल्हापूर (Kolhapur) मतदारसंघ लोकसभा निवडणूक 2024 उमेदवार

उमेदवारपक्ष
छत्रपती शाहू महाराजINC
संजय मंडलिकशिवसेना
Kolhapur MP Election 2024 candidates

Also Read : अक्षयतृतीया 2024 : Akshaya Tritiya 2024

कोण ठरणार कोल्हापूर चा Kingmaker

कोल्हापूर या लोकसभा मतदार संघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात ते पुढीलप्रमाणे :-

#मतदार संघआमदारपक्ष
271चंदगडराजेश पाटीलराष्ट्रवादी
272राधानगरीप्रकाशराव आबिटकरशिवसेना
273कागलहसन मुश्रीफराष्ट्रवादी
274कोल्हापूर दक्षिणरुतुराज पाटीलकाँग्रेस
275करवीरपी. एन. पाटीलकाँग्रेस
276कोल्हापूर उत्तर जयश्री जाधवकाँग्रेस
Kolhapur Assembly list

सध्याच्या काळाला महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना दिसून येतो.तरी कोल्हापूर मध्ये हे रुतुराज पाटील,पी. एन. पाटील आणि जयश्री जाधव हे महाविकास आघाडीच्या बाजूने तर राजेश पाटील, प्रकाशराव आबिटकर आणि हसन मुश्रीफ हे महायुतीच्या बाजूने प्रचार करताना दिसून येतील.याचा अर्थ असा होती कि दोन्ही उमेदवारांकडे अगदी बरोबर आमदारांचा पाठिंबा आहे

याच्या वातिरिक्त २ व्यक्ती असे आहेत जे कोल्हापूरच्या खरसदारकीच्या निवडणुकीत महतवाचे आहेत. ते म्हणजे काँग्रेस चे सतेज उर्फ बंटी पाटील आणि भाजपचे माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक.कोल्हापूर मधील पाटील विरुद्ध महाडिक हा विषय जगजाहीर आहे.तरी या निवडणुकीमध्ये बंटी पाटलांच्या दबदबा दिसून येतो. तरी बंटी पाटील हे २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे या वर्षी पण कोहापूरचे किंगमेकर बानू शकतात.

Kolhapur MP Video Source : YouTube

पाटील विरुद्ध महाडिक काय आहे हा विषय

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे कोल्हापूर, महाराष्ट्रातील दोन प्रभावशाली राजकीय व्यक्ती आहेत, ज्यांच्या कारकिर्दीतून प्रदेशाच्या राजकारणाचे गतिमान आणि स्पर्धात्मक स्वरूप दिसून येते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) शी संलग्न असलेले सतेज पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये गृह (ग्रामीण), वित्त आणि नियोजन राज्यमंत्री म्हणून विविध भूमिका बजावल्या आहेत. कौटुंबिक आणि पक्षीय संबंधांमुळे त्यांचा राजकीय प्रभाव मजबूत झाला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातून खासदार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रादेशिक विकासावर विशेषत: कृषी, उद्योग आणि पायाभूत सुविधांवर जोर देऊन त्यांचे लक्ष मुख्यत्वे राष्ट्रीय समस्यांवर केंद्रित आहे.

त्यांचे निवडणूक मार्ग अधूनमधून ओलांडले आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी समान मतदारसंघांवर प्रभावासाठी लढत असताना, त्यांनी प्रामुख्याने शासनाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित केले आहे- राज्याच्या बाबींवर सतेज पाटील आणि राष्ट्रीय घडामोडींवर धनंजय महाडिक.

त्यांच्या संबंधित भूमिका आणि राजकीय क्रियाकलाप प्रादेशिक विकास, आर्थिक धोरणे आणि पक्षाच्या विचारसरणीसाठी त्यांच्या भिन्न दृष्टीकोनांवर प्रकाश टाकतात, ज्यामुळे प्रत्येक निवडणूक कोल्हापूरच्या राजकीय परिदृश्याला आकार देणारी एक महत्त्वपूर्ण घटना बनते. त्यांचा चालू असलेला राजकीय सहभाग या प्रदेशातील विकास आणि प्रशासनाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कसा होता २०१९ च्या खासदारकीचा Result

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय सदाशिवराव मंडलिक यांनी 749085 मते मिळवून विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्या बाजूने 478517 मते पडली. संजय सदाशिवराव मंडलिक 270568 च्या मोठ्या फरकाने विजयी झाले.

उमेदवारपक्षएकूण पडलेली मते
संजय सदाशिवराव मंडलिकशिवसेना७४९०८५
धनंजय महाडिकराष्ट्रवादी478517
डॉ. अरुणा मोहन माळीVBA63439
नोटाNOTA8691
Kolhapur 2019 MP election result

कोल्हापूर खासदारकीचे Election कधी आहे?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा मे महिन्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीख 7 मे (टप्पा 3) आहे.

कोल्हापूर २०२४ खासदारकीचा निकाल कधी आहे?

4 जून रोजी कोल्हापूर मतदारसंघातील लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर होणार आहे.

1 thought on “कोण होणार 2024 मध्ये कोल्हापूर चा खासदार ? Kolhapur MP?”

Leave a Comment